मुक्ताईनगरचे पाच लोक मक्का मदीना साठी रवाना….

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मुक्ताईनगर शहरातील सिड फार्म मनियार मोहल्ला भागातून पवित्र मक्का मदीना येथे उमराह साठी पाच लोक रवाना होणार आहेत.

सिड फार्म येथील मुस्लिम मनियार मस्जिद ट्रस्ट चे खजिनदार मनियार बिरादरीचे चे उपाध्यक्ष शेख अहमद शेख यासीन ठेकेदार व त्यांची पत्नी साबेराबी शेख.अहमद, व शेख समद शेख इस्माईल व त्याची पत्नी मैराजबी व मुलगा शेख शाहरुख शेख समद असे एकुण पाच लोक उमराह साठी जात असुन, मुक्ताईनगर तालुका मनियार बिरादरी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी शेख अहमद शेख यासीन यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, कलीम मनियार, शेख अजीज शेख बिस्मिल्लाह, हाजी कादर शेख.मुसा, हमीद शेख मुनाफ, इच्छापुर येथील खलील मेम्बर, शेख हुसैन शेख मुसा आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.