ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याने जळगावात भाजपचा जल्लोष

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईतून ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री हे याचे शिल्पकार आहेत. या विजयाचा आनंद उत्सव आज वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालयात फटाके फोडून व पेढे भरवून साजरा करण्यात आला.

तर याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीणचे सरचिटणीस सचिन पान पाटील, मधु काटे, महानगर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, राजेंद्र मराठे, रेखाताई कुलकर्णी, राहुल वाघ, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, योगेश पाटील, गणेश माळी, नगरसेविका सुचीताताई हाडा, दीपमाला ताई काळे, जितेंद्र मराठे, मंडळ अध्यक्ष शक्ति महाजन, रेखा वर्मा, शोभा कुलकर्णी, आनंद सपकाळे, प्रवीण जाधव सर, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, प्रभाकर तायडे, हेमंत जोशी, भूषण भोळे, मंगेश जुनागडे, मिलिंद चौधरी, उमेश सूर्यवंशी, गौरव पाटील, राहुल पाटील, शुभम पाटील, स्वप्निल साखळीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.