‘बिग बॉस१७’ च्या सेटचे फोटो व्हायरल, यंदा कशी असणार घराची थीम?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस’चा सीजन १७ पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ‘बिग बॉस’चे चाहते नेहमीप्रमाणेच या सिजनची आतुरतेने वाट पाहत आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत अनेक नावांची चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानचा ग्रँड प्रीमियरमधील फर्स्ट लूक समोर आला आहे.

‘बिग बॉस १७’चा ग्रँड प्रीमियर १५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याआधीच शोच्या ग्रँड प्रीमियरची एक झलक देखील दाखवण्यात आली आहे. या फोटोंमध्ये सलमान खान नेहमीप्रमाणेच फुल स्वॅगमध्ये दिसत आहे.

‘बिग बॉस १७’चा सेट देखील प्रत्येक वर्षीप्रमाणे वेगळा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ सेट खूप प्रशस्त आहे. सलमान खानच्या या फोटोसह सेटचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहे. यावेळी ‘बिग बॉस’मध्ये १६ स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. अंकिता लोखंडे, विक्की जैन, मुनव्वर फारुकी, ईशा मालवीय आणि विवेक चौधरीसह अनेक सेलेब्रिटी आणि नॉन सेलेब्रिटी ‘बिग बॉस १७’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत.

१५ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता ‘बिग बॉस १७’ सुरु होणार आहे. प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉम जिओ सिनेमावर २४ तास हा शो लाईव्ह पाहू शकतात. त्याशिवाय सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता कलर्सवर पाहू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.