मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथे बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश…

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तालुक्यातील वाकोडी येथे शेत शिवारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वन्य प्राण्याने दहशत माजवली होती. गावातील शेतकऱ्यांना काम करत असतांना 24 मार्च रोजी सायंकाळी वन्य प्राणी दिसून आले, त्यांनी याबाबत माहिती सरपंचांना दिली. सरपंच शुभम काजळे यांनी माजी आमदारांना याबाबत माहिती कळवली. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र रात्र झाली असल्यामुळे शोध मोहित थांबविण्यात आली. बिबट्या की वाघ हे निश्चित नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान 25 मार्च रोजी सकाळी धुलीवंदनाच्या दिवशी गावातील एका शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला बघताच त्यांनी या संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली व गावकऱ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबतची माहिती वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स युनिट या पथकाला माहिती दिली. पथकाने गांभीर्य लक्षात घेत बिबट्या असलेल्या शेत शिवारात दाखल झाले. बिबट्या रात्री शेतातील पिके खाऊन सुस्त अवस्थेत फिरत असतांना शेतकऱ्यांना दिसला. रॅपिड रिस्पॉन्स युनिट घटनास्थळी पोहचले व बिबट्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान बिबट्याला गन द्वारे बेशुध्द होण्याचे इंजेक्शन दिले. बिबट्या काही क्षणातच बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला रेस्क्यू करून वन विभागाच्या टीमने पिंजऱ्यात जेरबंद करून घेऊन गेले. ही कारवाई सहाय्यक वनरक्षक ए.एन. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, आर.बी. शिरसाट,रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, एस.एस.यांनी केली यावेळी डॉ. गजानन भोळे, श्रीकृष्ण उगले, दिलीप तायडे, मलकापूर पोलीस, होमगार्ड पथक, सरपंच शुभम काजळे ग्रामपंचायत सदस्य योगेश काजळे, शेतकरी बळीराम कुयटे, सुनील ठाकूर, रोहित तायडे, मुरलीधर काजळे, परमेश्वर काजळे आदींनी मदत कार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.