17 वर्षीय युवतीची गळफास घेवून आत्महत्या

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील हुडको कॉलनी येथील रहिवासी कोमल भगवान तायडे (वय 17) या युवतीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी 1. 10 वाजेपूर्वी घडली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी कोमल तायडे या युवतीने तिच्या राहत्या घरात आई खालच्या घरात असतांना वरच्या मजल्यावर येऊन दोरीने गळफास घेतला. आईने मुलीस आवाज दिल्यावर ही तिने उत्तर दिले नसल्याने आई वरच्या मजल्यावर आली असता, मुलीने गळफास घेतल्याचे दृष्य दिसले. यामुळे तिच्या आईने हंबरडा फोडला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक गजानन पडघन, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. कोमल ही युवती नाहाटा कॉलेजला अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिचे वडील भगवान तायडे हे सुध्दा नाहाटा कॉलेजमध्येच नोकरीला आहे. कोमलच्या पश्चात दोन बहीणी, आई, वडील असा परीवार आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृत कोमलचे पालिका रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

भुसावळात शहर पोलिस ठाण्यात नोंद

भुसावळ शहर पोलिस ठाण्यात सतीश सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गळफास घेतलेली दोरी जप्त केली. सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.