ब्रेकिंग; भुसावळ मध्ये भूकंप

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्यातील भुसावळ शहरात आज २७ जानेवारी सकाळी १०. २२ ते १०.३३ दरम्यान अचानक विविध भागात दोन ते चार सेकंदाचे सौम्य भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले.शहरात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाअधिकारी राहुल पाटील यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान दुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नाही. शहरात भूकंपाचा पहिला धक्का वाजून १०.२२ मिनिटांनी गडकरी नगर येथे जाणवला.

आपत्ती व्यवस्थापन अधिकार रावळ यांच्या सूचनेनुसार भुसावळ परिसरात 3.3 रि.स्केल चा धक्का जाणवला आहे. तसेच पुढील भूकंपाचा धक्का आणखी तिव्र राहू शकतो .तरी सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर थांबावे. अशी सूचना असुरक्षितता अधिकारी यांनी नागरिकांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.