बंजारा समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक – महंत जितेंद्र महाराज

0

बंजारा समाजासाठी प्रस्ताव पारित
लोकशाही न्युज नेटवर्क
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा कुंभाच्या दुसर्या दिवशी धर्मसभेत पोहरागड येथील महंत जितेंद्र महाराज यांनी गोर बंजारा समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असून आपण सर्व सनातन धर्माचे आहोत असे प्रतिपादन केले. भारतामध्ये काई प्रांतात पैश्याचे अमिश दाखवून तंत्र मंत्राचे अमिश दाखवून ख्रिश्चन मिशनरीकडून आक्रमण होत आहे. महाराष्ट्र व तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत आहे. गोर बंजारा संस्कृती विशाल आहे., आपल्यात तिजचे गीत, होळीचे गीत, दिवाळीचे गीत सर्व आपण टिकून ठेवलं आहे इतकी मोठी संस्कृती असताना काही लोक आपल्याला अमिश दाखवून धर्मांतरण करत असेल ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. बामसेफ सारख्या काही संघटना जाणीवपूर्वक समाजात संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांना बळी पडू नका असे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर मा. श्यामजी हरकरे, अ.भा. सह धर्मजागरण प्रमुख चेन्नई, संत गोपाल चैतन्य महाराज, पू. संत बाबूसिंगजी महाराज, पू. संत जितेंद्र महाराज, डॉ. मोहनसिंग चव्हाण, पू. संत गुरुप्रसाद नायक ( बेंगलोर ), पू. संत सुरेश महाराज, मा. विनायकराव देशपांडे, पू. संत महामंडलेश्वर अखिलेश्वरानंदजी महाराज, पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, शाम चैतन्य महाराज, दिव्य चैतन्य महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १० वा. मान्यवर संतांच्या हस्ते कुंभस्थळी झेंडा वंदन करण्यात आले.

श्यामजी हरकरे यांनी मार्गदर्शन करतांना भारतावर हूण, शक आणि ग्रीक यांनी आक्रमणे केली . हिंन्दुनी त्यांचा प्रतिकार केला . त्यांना पराजित करून त्यांना धर्म आणि देशा बद्दल सांगितले ते त्यांनी समजून घेऊन आत्मसात केले ते वैष्णव, शैव बनले. मुस्लिम आणि ख्रिशचन यांनी आक्रमण केले. त्यांनी केवळ त्यांचाच धर्म सत्य मानून मंदिरे नष्ट केली. हिंदूंना गुलाम करून त्यांच्या देशात घेऊन गेले. अशा प्रकारे त्यांनी हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे धर्मांतरण केले. संतांनी समाज जागृत केला. त्याचवेळी इसाई लोकांनी जबरदस्तीचे, कपट करून लोकांना ख्रिस्ती केले. अशिक्षित, कष्टकरी लोकांना धर्मांतरित केले. मुस्लिमांनी १३०० वर्षांपासून भारताला इस्लामिक देश बनविण्याचा प्रयत्न केला तर ५०० वर्षांपासून ख्रिस्ती मिशनरी भारताला इसाई राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू धर्मांतरित झाला तर एक हिंदू घटतो व देशाचा शत्रू वाढतो ” जेथे धर्मांतरित वाढतात तो भू भाग देशापासून बाजूला होतो. धर्मांतरित झालेल्यांची घरवापसी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पू. संतगोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात हा कुंभ धर्माचा कार्यक्रम आहे. ” धर्म जिवंत राहिला तर आम्ही जिवंत राहू , राष्ट्र जीवन राहील “. धर्म रक्षणाची जबाबदारी आपली आहे. कुंभामुळे धर्मांतरण चे सत्य समोर आले. समाजाला धर्महीन केले जात आहे. प्रलोभन देऊन मिशनरी धर्मांतरण होत आहे. ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांनी तिलक लावू नये, माळ घालू नये असे संस्कार असतात. अशा शाळेत मुलांना टाकू नका. हिंदू संस्कार असलेल्या शाळेत मुलांना टाका. “गुरुवर निष्ठा पाहिजे धर्म परिवर्तन करू नका. धर्मच आपला प्राण गुरूचा हाथ पकडून धर्म रक्षा करायची आहे.

पू. संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात या कुंभात देश भरातून संत आणि भाविक आले आहेत. संतांनी ४ महिने विविध गावी जाऊन कुंभ बाबतीत जागृती केली. राईचा पर्वत करण्याची ताकद संतांमध्ये आहे. कुंभाला काहीजण विरोध करत आहे, पण जेव्हा जेव्हा विरोध होतो तेव्हा तेव्हा कार्यक्रम यशस्वी होतात असे सांगितले.

डॉ. मोहनसिंग चव्हाण यांनी बंजारा समाजासाठी धर्म सभेत प्रस्ताव ठेवला. यात पूज्य बालाजी, जगदंबा, भगवान श्रीकृष्ण यांची मंदिरे प्रत्येक तांड्यात राहतील. प्रत्येक परिवार सकाळ – संध्याकाळ मंदिरात आरतीला जाण्याची परंपरा बनवेल. घरा घरात महापुरुष संत सेवालाल, रामराव बापू, गुरुनानकदेवजी यांचे फोटो ठेवतील. पूज्य सेवालाल नित्य पाठ करतील. “गोरमाटी” भाषेचे संरक्षण व संवर्धन करील. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. डॉ. चव्हाण यांनी लव जिहादवर बोलताना मुलींना हिंदू संस्कार देण्याबद्दल मार्गदर्शन केले. आपण हिंदू धर्मात जन्म घेतला असून धर्माचे ऋण फेडण्याचिरी वेळ अली असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषद संघटन मंत्री विनायकराव देशपांडे यांनी जनगणना व ओ आर पी याविषयी जागृती केली. ते म्हणाले, सेवालाल महाराज गोसेवक होते, त्यांनी आयुष्यभर गोसेवा केली, प्राणी मात्रांची सेवा केली. तुमचं धर्मांतर करण्यासाठी येणारे ख्रिस्ती मिशनरी, मुल्ला मौलवी गोहत्या करणारे आहे. त्यांच्यापासून सावध राहायला हवं. आम्ही गोकुळ अष्टमी, रामनवमी, होळी, दिवाळी सोबत साजरी करतो. आपल्या देवांनी पराक्रम केलाय, दुष्ट लोकांचा संहार केलाय. त्यामुळे आपले देव शक्तिमान असून आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. भारतातील हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्ती मिशनर्यांना ख्रिश्चन लोकसंख्या वाढवायची आहे तर मुस्लिमांना मुस्लिम लोकसंख्या वाढवायची आहे. त्यासाठी जनगणनेच्या माध्यमातून देशविरोधी मोठे षडयंत्र सुरू असून हिंदूंमध्ये दुही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ओआरपी व आरएनएस चा वापर केला जातोय. हिंदूंमध्ये जतिजातीत संघर्ष निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे येत्या जनगणनेत सर्वांनी आपला धर्म ‘हिंदू’ लिहावा असे आवाहन केले.

संत जितेंद्र महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात देशात गोरबंजारा समाजाची हानी समाजाच्या लोकांना आमिष देऊन धर्मांतरण होते आहे.आपण हिंदू धर्माचाच भाग आहे. लोक गैसमज पसरविण्याचा प्रयत्न करत असतात. पार्वतीला आपण भवानी मानतो आणि पार्वती पुत्राला विरोध करतो. गोरमाटी संस्कृती हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे. ” लव जिहाद ” देशातील दुसरा आतंकवाद आहे असेही ते म्हणाले.

पू. संत महामंडलेश्वर अखिलेश्वरानंद महाराजांनी आपल्या भाषणात कुंभ हे हिंदू परंपरेची कार्यशाळा आहे. मुघल आणि इंग्राजासोबत काही विकृतीही देशात आल्या. ” देशाचे विभाजन धर्माच्या आधारे झाले, तर भारत हिंदू राष्ट्र व्हायला हवे होते”. भारतीय राज्य घटना लोकतंत्र गीता आहे. आपल्या पूर्वजानी गुढघे टेकले नाही तर संघर्ष केला. संतांनी भारत जोडण्याचे काम केले. गोहत्त्या थांबविण्यासाठी कठोर कायदे व्हायला हवेत.

पुढच्या वर्षी वसंत पंचमीच्या दिवशी राम मंदिर पूर्ण होणार – पू. गोविंद देवगिरीजी महाराज

पू. संत. गोविंददेवगिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात संतांनी धर्म जिवंत ठेवला. पुढील वर्षी वसंत पंचमीला राम मंदिर पूर्ण होणार आहे. मिशनऱ्यांच्या आमिषाला फसू नका , जे लोक आपल्याला हिंदू पासून दूर करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पासून सावध रहा . श्रीराम यांनी वनवासींची गळा भेट घेतली. ” हम हिंदू रहेगे और औरोको भी हिंदू रखेंगे ” अयोध्या येथिल निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर सुरु होण्यापूर्वी ” एक कोटी हनुमान चालीसा ” अभियान सुरु केले आहे. राममंदिर हे राष्ट्र मंदिर आहे. येणारी चार शतके हि भारताची असतील असे त्यांनी सांगितले .

 

Leave A Reply

Your email address will not be published.