१ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर गुन्हा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
बीएचआर प्रकरणात सुरज झंवर पिता-पुत्राला मदत करण्याच्या आमिषाने तब्बल १ कोटी २२ लाख रूपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

जळगावच्या प्रचंड गाजलेल्या घरकूल घोटाळ्यात जोरदार बाजू मांडणारे सरकारी वकील हे अलीकडच्या कालखंडात पेन ड्राईव्ह बॉंबच्या माध्यमातून चर्चेत आले होते. गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यामुळे त्यांना सरकारी वकील पदावरून देखील हटविण्यात आले होते. आता याच प्रवीण चव्हाण यांच्यावर तब्बल १ कोटी २२ लाख रूपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत बीएचआरचे तत्कालीन ऑडिटर शेखर सोनाळकर आणि चाळीसगावातील वाईन शॉपचे संचालक उदय नानासाहेब पवार यांच्या देखील समावेश आहे. ही फिर्याद सुरज सुनील झंवर यांनी दाखल केल्यावरून कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.