लातूर आगाराच्या बसला मुरुडजवळ अपघात ; ४२ प्रवासी जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

लातूर आगारातून आज सकाळी पुण्याकडे निघालेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुरुड जवळ झालेल्या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची अवस्था गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तसेच, बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी एसटी (MH 20 BL 2372) लातूर आगारातून पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे आली असताना अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे पुलावरच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बल खाली कोसळली. बसची समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामुळे आतील प्रवाशांना हादरा बसला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बसमधील 42 प्रवासी जखमी झाले. यातील 14 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून 14 जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.