भिवंडी इमारत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना अटक

0

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भिवंडी (Bhiwandi) मध्ये इमारत कोसळली आणि सर्वांनाच धक्का बसला. हि इमारत तीन माजली असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य युद्धपालटीवर सुरु आहे. इमारती खाली २२ जण अडकले होते त्यापैकी १४ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी (Bhiwandi Police) गुन्हा दाखल करत इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे. नारपोली पोलिसांनी इमारत मालक इंद्रपाल पाटील यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. इंद्रपाल पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये अनेक खोल्या या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, या जीर्ण झालेल्या इमारतीवर मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारत दुर्घटनेमध्ये (Building accident) मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासन करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री अकरा वाजता घटनास्थळाला भेट देत पाहणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.