Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»जनसंघाच्या तीन खासदारांपासून 303 पर्यंत घौडदौड !
    राष्ट्रीय

    जनसंघाच्या तीन खासदारांपासून 303 पर्यंत घौडदौड !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 15, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभेसाठी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. याआधी दोन वेळा या पक्षाची देशात एकहाती सत्ता होती. तर तिसऱ्यांदा देशात आपलेच सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आज 400 च्या पुढे जागा मिळवण्याची इच्छा बाळगलेल्या या पक्षाचे कधीकाळी केवळ 3 खासदार होते, जे पुढे 303 पर्यंत गेले. तर जनसंघाच्या 3 खासदारांपासून भाजपचे 303 खासदारांपर्यंतची राजकीय घौडदोड मोठी रंजक आहे.

    राज्यघटना लागू झाल्यानंतर 1952 मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. या पक्षाला 489 पैकी 464 जागा मिळाल्या. त्याचे कारण होते स्वातंत्र्य काळातील काँग्रेसचे योगदान आणि त्यामुळे काँग्रेसने देशातील जनतेच्या मनात घर केले होते. शिवाय या काळात काँग्रेसचे वर्चस्व एवढे होते की विरोधी पक्ष केवळ नावाला उरले होते.

    जनसंघ आणि जनता पक्ष वेगळे झाले

    विरोधी पक्षांमध्ये एक पक्ष होतो तो म्हणजे जनसंघ. हिंदुत्वाची कास धरून हा पक्ष काम करत होता. पहिल्या निवडणुकीत या पक्षाचे 3 खासदार निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत या पक्षाच्या खासदारांची संख्या दोन अंकी झाली. या निवडणुकीत त्यांचे 22 खासदार झाले. परंतु, 1977 आणि 1980 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर जनसंघ निवडणूक लढला. पुढे 1980 मध्ये जनसंघ आणि जनता पक्ष वेगळे झाले त्याचवर्षी जनसंघाचे भारतीय जनता पक्ष असे नामकरण झाले.

    जनसंघाला 1989 मध्ये देशात 85 जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला 197 पुढे 1991 मध्ये काँग्रेसला 244 आणि भारतीय जनता पक्ष लढला त्यांना तब्बल 121 जागांवर यश मिळाले. त्यानंतर भाजपचे खासदार हे तीन अंकी संख्येचेच राहिले. 1999 मध्ये भाजपचे 182 तर काँग्रेसचे 114 खासदार होते. यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुककांमध्ये भाजपला 138, 116 अशा जागा मिळाल्या.

    मोदी लाट

    भाजपने एकहाती सत्ता मिळवली ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात. 2024 च्या निवडणुकांनंतर भाजपला चांगले यश मिळाले यावेळी मोदींचा करिष्मा अवघ्या देशाने पाहिला. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तब्बल 282 जागा आल्या आणि देशात एनडीएचे सरकार आले. तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा घुमला आणि मोंदीच्या नेतृत्व मान्य करत देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपला विजयी केले. ती निवडणूक होती 2019 ची या निवडणुकीत भाजप 300 पार झाला आणि त्यांचे 303 खासदार निवडणून आले. तर आता या पक्षाच्या आपेक्षा वाढल्या असून यंदा आपण 400 पार जाऊ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचा हा चढता आलेख या निवडणुकीतही असाच राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष हा आणीबाणीपूर्वी भारतीय जनसंघाच्या नावाने कार्यरत होता. 21 ऑक्टोबर 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. या पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आरएसएसचे स्वयंसेवक होते.

    आणीबाणीमुळे एकवटले विरोधक

    तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली. या काळात त्यांनी आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात घातले. जनतेच्या तीव्र विरोधामुळे 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली. आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी केले होते. त्यांच्या सूचनेनुसार देशातील सर्व विरोधी पक्ष जनता पक्षाच्या नावावर एकत्र आले.

    भारतीय जनसंघही त्यामध्ये विलीन झाला आणि 1977 ची निवडणूक विरोधकांनी जनता पक्षाच्या नावावर लढवून इंदिरा गांधीचा पराभव केला. यानंतर जनता पक्ष सत्तेत आला परंतु वैचारिक मतभेदामुळे जनसंघाचे नेते जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपची स्थापन केली.

    #bjp Bharatiya Janata Party Loksabha Election 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif