मोठी बातमी; लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींच ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितलं की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. हे सांगतांना मला अतिशय आनंद होतो. माझं त्यांच्याशी बोलणं झालं असून, त्यांचं मी अभिनंदन केलं.

मोदी पुढे म्हणतात, लालकृष्ण अडवाणी हे माझ्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारणांपैकी एक आहेत. भारताच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. अगदी तळागाळापासून काम करून ते उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. त्यांची कारकीर्द कायमच समृद्ध करणारी ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.