दहावीच्या मुलीला पळवून लॉजवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. सदर पिडीत मुलगी ही दहावीत शिक्षण घेत आहे. २१ मार्च रोजी मुलीचा १० वीचा हिंदीचा पेपर सुटल्यावर गावातील संशयित आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पुर्ण नाव माहित नाही) यांनी पिडीत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका लॉजवर नेत तिथे तिच्यावर कृष्णा चौधरी याने अत्याचार केला.

दरम्यान या अत्याचाराचे बंटी याने फोटो काढले. इतकेच नाही तर अत्याचाराचे फोटो व्हायरल केल्याची माहिती देखील समोर आले आहे. हा संपूर्ण घडलेला प्रकार पिडीत मुलीने घरी सांगितल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.