ऊर्जामंत्री राऊतांचा पुतण्या सांगत ११ जणांना गंडवले; गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगत विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप राऊत असं आरोपीचं नाव आहे.

सदर आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने ११ जणांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतःला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितलं होतं. तसेच राऊत आपले काका असून आपण विद्युत विभागात सरकारी नोकरी लावून देऊ, या बहाण्याने आरोपी संदीप राऊतने ११ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील दादर पोलिसांनी संदीप राऊत या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संदीपला राऊतला अटक करण्यात आली की नाही, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.