भडगाव शेतकरी सहकारी संघाची निवडणूक, २१ मे रोजी मतदान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव (Bhadgaon) शेतकरी संघ ही तालुक्यात नावाजलेली संस्था आहे. यात १५ जागांसाठी यासाठी दिनांक २१ मे रोजी मतदान होत असून दिनांक २२ रोजी निकाल लागणार आहे. १५ जागांमध्ये यात ६ जागा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ, ४ जागा व्यक्तिशः मतदार संघ, १ जागा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ, १ जागा इतर मागासवर्गीय मतदार संघ, १ जागा वी.जा.म.ज मतदार संघ, २ जागा महिला राखीव अशा जागा आहेत.

या निवडणुकी साठी आज दुपारी ३ वाजे अखेर अनेकांनी माघार घेतली. निवडणुकी साठी १०९ अर्ज प्राप्त होते. यात १ अर्ज दोनदा दाखल असल्याने तो एकच ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे १०८ वैध अर्जा पैकी ७८ जणांनी आज दिवसभर नाट्यमय रित्या टप्प्ाटप्प्याने माघार घेतल्याने या निवडणुकीत केवळ ३० अर्ज शिल्लक राहिले आहे. हि माहिती सहाय्यक निबंधक महेश कासार यांनी दिली.

सर्व साधारण संस्था मतदार संघात ९ रिंगणात आहे. व्यक्तिशः मतदार संघात १० उमेदवार, महिला मतदार संघात ४ उमेदवार रिंगणात, इमाव मतदार संघात २ उमेदवार रिंगणात, अनु जाती जमाती मतदार संघात २ उमेदवार रिंगणात, विमुक्त जाती भटक्या जमाती, विमाप्र मतदार संघात ३ उमेदवार असे एकूण ३० उमेदवार रिंगणात आहे, यात सत्ताधारी गटासह महाविकास आघाडी असे दोन गटात निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी ४ हजार ३१२ मतदार आपला हक्क बजावणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.