महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे खंदे नेतृत्व: नावंदर

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर (Anil Navander) यांचा काल ६३ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि साधेपणाने विविध अशा सामाजिक कामांनी साजरा झाला. केमिस्ट असोसिएशन (Chemists Association) ही संघटना राज्यात मजबूत करणाऱ्या राज्य अध्यक्ष जगन्नाथ शिंदे (Jagannath Shinde) यांचे बरोबर मानद सचिव अनिल नावंदर यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील मेडिकल व्यवसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणून अनिल नावंदर यांचा सिंहाचा वाटा आहे. अत्यंत मितभाषी पण बोलतील ते तोलून मापूनच. खामगाव शहरात एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करणारी ही व्यक्ती. स्वतःचे अपेक्षा मेडिकल स्टोअर उभारून व्यवसायाला सुरुवात केली. अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मेडिकल व्यवसाय करणारे अनिल नावंदर यांनी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांची खामगाव येथे ए क्लास फार्मासिस्ट कंपनी कार्यरत आहे. आपल्या व्यवसाय करताना अनिल नावंदर यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. आपल्या व्यवसायाबरोबर त्यांनी केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून अनेक छोट्या छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यामुळे खामगाव शहर बुलढाणा जिल्हा एकमेव नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व केमिस्ट बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे ते उभे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व केमिस्ट बांधव त्यांना जणू देवच मानतात. कोणी त्यांना केमिस्ट व्यवसायातील परिसाची उपमा देतात. केमिस्ट व्यवसायातील एका स्पर्धक व्यवसायिकांच्या पाठीशी आपले निष्ठा वाहणारे व्यावसायिक आहेत. त्यांचे कारण शोधले तर अनिल नावंदर यांना यांचा सर्वांना सहकार्य करणारी भूमिका ही होय. केमिस्ट बांधवांच्या अटीतटीच्या अडीअडचणीच्या काळात त्यांना सहकार्य करण्याची भावना हे होय. केमिस्ट बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेचे एक पदाधिकारी म्हणून ते खंबीरपणे करतात हे होय. आज राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि मानद सचिव अनिल नावंदर ही जोडी प्रसिद्ध आहे. राज्य प्रशासन अथवा केमिस्ट विभागाचे अधिकाऱ्यांशी त्यांचा फार मोठा दबदबा आहे. हा दबदबा असण्याचे एकमेव कारण म्हणजे निष्ठेने, प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे व्यवसाय करण्याचे घेतलेले व्रत होय. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला त्यांच्याकडे थारा दिला जात नाही, हे होय. त्यामुळे ताट मानेने व्यवसाय ते करू शकतात.

अनिल नावंदर हे केमिस्ट्री व्यवसायिक असले तरी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून काही वाटा सामाजिक कार्यासाठी देऊन अत्यंत आदर्श असे समाज कार्य करतात. हे त्यांच्यातील विशेष गुण आदर्श म्हणून इतरांसाठी घेण्यासारखे आहे. आपल्या 63 वा वाढदिवस कसलाही लवाजमा, अथवा देखावा म्हणून साजरा न करता अत्यंत साधेपणाने साजरा केला. केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून केमिस्ट बांधवांचे तसेच सामाजिक कार्यामुळे अमूल्य लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अत्यंत साधेपणे फक्त शुभेच्छा स्वीकारणाऱ्या वाढदिवस साजरा करणारे व्यक्तिमत्व विराळेच. त्यापैकी एक अनिल नावंदर यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. खामगाव तालुक्यातील पाडसे येथील निराधार केंद्रामध्ये जाऊन ते निराधारांना औषधांची मदत तर करतातच. पण वाढदिवसा निमित्त त्या केंद्रात जाऊन सत्कार सोहळा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांकडून फक्त शुभेच्छा घेऊन हार तुरे, शाल, श्रीफळ, भेटवस्तू स्वीकारणे ऐवजी किराणा वस्तू देण्याचे त्यांनी आवाहन केले. किराणामाल निराधार केंद्राला प्रत्यक्ष जाऊन निराधार संचालकांच्या सुपूर्त केला. स्वतः केमिस्ट असल्याने रक्तदानाचे महत्त्व त्यांना माहीत असल्याने बुलढाणा (Buldhana) येथे वाढदिवशी मोठ्या त्यांच्या चाहतांनी रक्तदान केले. गरिबांना अन्नदान करून गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचे हास्य फुलवले. हे सर्व करत असताना दररोज किमान एक चांगले कार्य माझ्या हातून झाले पाहिजे, असा संकल्प करणाऱ्या अनिल नावंदर यांना दैनिक लोकशाहीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.