भडगावात घरासमोर लावलेली बजाज पल्सर गाडी चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरातील यशवंत नगर भोई वाडा येथून, घरासमोर लॉक करुन लावलेली बजाज पल्सर गाडी अज्ञाट चोरट्यांनी चोरी केल्याची घटना दि.२६रोजी सकाळी पाच वाजेदरम्यान घडली. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे सी.सी.टी.व्हीत कैद झाले आहे.

या बाबत अधिक महिती अशी की, फिर्यादी योगेश शांताराम शेलार वय 26 धंदा मजुरी रा. यशवंतनगर भोईवाडा भडगांव ता. भडगांव याने दिलेल्या फिर्यादीत असे सांगितले आहे कि, माझ्या वडीलांच्या नावे असलेली बजाज पल्सर १५० सी. सी. ची एम.एच. १९ सी.क्यू.५३४३ या क्रमांकाची मोटरसायकल
दिनांक २६ रोजी रात्री १०:३० वा. सुमारास मी कामावरून आलो व माझी मोटर सायकल घरासमोर नेहमी प्रमाणे लावली होती. दिनांक २६ रोजी सकाळी ५ वा मी झोपेतून उठल्यावर घराच्या बाहेर फिरण्यासाठी आलो असता, तेव्हा मला माझी मोटर सायकल ही घराच्या बाहेर दिसली नाही. त्यानंतर मी घराच्या आजु बाजुस माझ्या मोटर सायकलचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर मी गावात शोध घेतला असता सापडली नाही. म्हणुन माझी खात्री झाली की, माझी मोटर सायकलचा क्रमांक एम.एच. १९ सी.क्यू.५३४३ ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली, म्हणुन भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु. र. न.१८८/२०२३ भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. कॉ. एकनाथ पाटील हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.