भडगावच्या शोरूममधून दुचाकी लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

0

२६ मोटारसायकली जप्त ; एलसीबीच्या पथकाची कारवाई

जळगाव ;- येथील भडगाव च्या साई शोरूम मधून ३० दुचाकी चोरणारा भामटा हा शोरूम मधील कर्मचारीच असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला एलसीबीच्या पथकाने २६ दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. टप्प्याटप्प्याने दुचाकी लांबविण्याचा प्रकार त्याने केला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शोरुममधील मेकॅनिक शोएब खान रऊफ खान रा. नगरदेवळा ता. पाचोरा असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

भडगाव येथे साई ऑटो बजाज शोरूमचे संचालक रावसाहेब केशव पाटील (वय ५६, रा. गणेश कॉलनी, भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे आहे. ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपूर्वी अज्ञात चोरटयांनी रावसाहेब पाटील यांच्या शोरूम मधून २२ लाख ७७ हजार ९८० रुपयांच्या ३० दुचाकी टप्प्याटप्प्याने चोरून नेल्याचा प्रकार उघड झाल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता .

अशी केली अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने शोरुममधील मेकॅनिक शोएब खान रऊफ खान रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांच्याकडे संशय आल्याने लक्ष केंद्रित केले. तो मागिल दहा महिन्यापासून काम करीत होता. शोएब हा सकाळी आठ वाजता शोरूमला जाऊन साफसफाई करायचा . यावेळी शोरूममध्ये कोणी नसल्याची संधी हेरून शोरूम मधून दोन महिन्यांत एक ते दोन दिवसाआड नवीन दुचाकी लांबवायचा . अश्याप्रकारे दोन महिन्यांत १४ पल्सर व १६ प्लॅटिना तब्बल ३० नवीन विनानंबरच्या नव्या दुचाकींची त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

नागद गावात एक व्यक्ती नवी कोरी दुचाकी घेऊन फिरत असताना त्याला संशयावरून पोलिसांनी विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्याला विश्वासात घेतल्यावर, त्याने भडगाव येथील संशयित आरोपीचे नाव सांगितले. तेव्हा हा गुन्हा उघड झाला आहे. शोएब खान याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पीएसआय गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, महेश महाजन, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी या पथकाने ही कारवाई केली आहे.

संशयित शोएब खान व त्याचे सहकारी यांनी चाळीसगाव,मालेगाव, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद, पिशोर, कन्नड, भराडी, बाळापूर ,नागद, जामठी अशा विविध भागांमध्ये दुचाकी कमी किमतीत विक्री केल्या आहे. या दुचाकीतून ११ पल्सर, १५ प्लेटीना अशा १९ लाख ५८ हजार १३९ रुपयांच्या २६ दुचाकी जमा करण्यात आल्या आहेत. शोएब सोबत त्याला मदत करणाऱ्या इतर संशयित साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.