पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या बेन्नू उपग्रहाच्या मातीमध्ये आढळले पाणी

0

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या बेन्नू उपग्रहाचे रहस्य उलगडण्यात नासाच्या वैज्ञानिकांना यश मिळाले आहे. नासाचे एक यान या उपग्रहावरील मातीचे नमुने घेऊन परतल्यानंतर या मातीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कार्बन आणि भरपूर प्रमाणात पाणी मिळाले असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

थोडक्यात पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करणारे दोन घटक बेन्नू
ग्रहावर असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पृथ्वीवर आतापर्यंत आणलेल्या लघुग्रहांच्या सॅम्पलपैकी हे सगळ्यात जास्त कार्बन-रिच सॅम्पल असल्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रहस्य उलगडण्यातही मदत होऊ शकेल, असे मत नासाचे संचालक बिल नेस्लन यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, बेन्नू हा उपग्रह अतिशय वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. १९९९ साली या उपग्रहाचा शोध लावण्यात आला होता. नासाने दिलेल्या माहितीनुसार, २९८२ साली हा उपग्रह पृथ्वीला धडकू शकतो. त्यामुळे गरज भासल्यास अंतराळातच त्याची दिशा बदलण्याची अथवा नष्ट करण्याची नासाची योजना असून त्यामुळेच याच्या मातीचे नमुने नासाने जमवले आहेत. नासाच्या या योजनेनुसार केवळ ६० ग्रॅम माती आणणे अपेक्षित होते. मात्र यानाने १०० ते २५० ग्रॅम माती आणली आहे. या मातीचे सॅम्पल जगभरातील ६० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले असून सुमारे दोनशे वैज्ञानिक या मातीचा अभ्यास करणार आहेत. बेन्नू उपग्रहावरील मातीचे नमुने आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ‘ओसीरसि- आरईएक्स’ मोहीम राबवली होती. या उपग्रहावरील मातीचे नमुने घेऊन नासाचे यान गेल्याच महिन्यात पृथ्वीजवळ पोहोचले होते. त्यानंतर या मातीचा अभ्यास करताना सोशल मीडियातील एका पोस्टमध्ये नासाने या मातीच्या सॅम्पलचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार या मातीमध्ये जेवढा अपेक्षित होता त्याहून अधिक प्रमाणात कार्बन आढळला असून मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचा दावा नासाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.