डेंग्यूने पाचोरा येथील तरुणीचा मृत्यू

0

पाचोरा : येथील पुनगाव रोड भागात राहणाऱ्या तरुणीचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

चेतना शांताराम पाटील (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून तिला चार दिवसांपूर्वी ताप असल्याने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा

होत नसल्याने जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १४ रोजी रात्री उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शांताराम पाटील यांची ती कन्या असून चिंचखेडा (ता. पाचोरा) या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..

Leave A Reply

Your email address will not be published.