बेंडाळे महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या विज्ञान मंडळाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी डॉ. प्रणिता वडोदकर यांचे “भारतीय सण -उत्सवा मागचे विज्ञान” या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी भूषविले. तसेच उपप्राचार्य सुनिता पाटील, समन्वयक प्रा.एन. जी. बावस्कर कार्यक्रमास उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. प्रणिता वडोदकर यांनी विद्यार्थिनींना श्रद्धेच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन समजावून सांगितले. तसेच प्राचीन काळी ऋषीमुनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच सर्वच कार्य पार पाडीत होते असेही या प्रसंगी सांगितले. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण पूरक वेशभूषा आहार विहार असला पाहिजे. आणि सणसाजरे करताना त्यावेळी घेण्यात येणाऱ्या आहाराचे शास्त्र सुद्धा विद्यार्थिनींना सोप्या शब्दात समजावून सांगितले.

पारंपारिक सण आनंदी वृत्तीने साजरे केले तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. वीणा चौधरी यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा. पल्लवी भालेराव आणि आभार प्रदर्शन प्रा. सविता राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.