जुळून येती धाड सत्र; प्राप्तीकर विभागाची अनोखी शक्कल…

0

 

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी (IT Officers) अनोखी शक्कल लावून जालना (Jalana) शहरात धाड (Raid) सत्र केल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी आपल्या वाहनांवार विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून आगमन केले. विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून दाखल झालेल्या वाहनात बसून आलेल्या प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या.

3 ऑगस्ट रोजी जालना शहरात सकाळीच सुमारे शंभर वाहनातून साधारण दोनशे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पथक डेरेदाखल झाले. प्रत्येकाच्या वाहनावर “विवाह सोहळा” असे स्टीकर लावण्यात आले होते. विवाह सोहळ्याचे स्टीकर लावून आलेली फौज ही आयकर अधिकारी व कर्मचा-यांची असल्याचे काही वेळाने सर्वांच्या लक्षात आले. औद्योगिक परिसरातील काही कंपन्यांसह जालना शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व घरांवर छापा टाकल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.