ऑक्टोबर महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद !

0

नवी दिल्ली ;- ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, नवरात्री आणि दसऱ्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI च्या लिस्टनुसार ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील आणि प्रादेशिक बँकांनाही 15 दिवस सुट्टी असेल. अशा परिस्थितीत, बँकेशी संबंधित कोणतेही काम हाताळताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, सुट्टीची यादी अगोदरच पाहून तुमच्या सुट्टीचे नियोजन करा .

ऑक्टोबरमध्ये या दिवशी राहणार बँका बंद

1 ऑक्टोबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2023- गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
8 ऑक्टोबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
14 ऑक्टोबर 2023- महालयामुळे कोलकात्यात आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
15 ऑक्टोबर 2023- रविवारमुळे संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
18 ऑक्टोबर 2023- गुवाहाटीमध्ये काटी बिहूमुळे बँका बंद राहतील.
21 ऑक्टोबर 2023- दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना सुट्टी असेल.
22 ऑक्टोबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
24 ऑक्टोबर 2023- दसऱ्यामुळे हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2023- दुर्गा पूजा (दसई) / परिग्रहण दिवस गंगटोक , जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील
27 ऑक्टोबर 2023- गंगटोकमध्ये दुर्गापूजेला (दसई) बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर 2023- कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑक्टोबर 2023- देशभरात बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2023- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.