पावसाच्या खंडामुळे शेतीविषयक विम्यात ५०% मोबदला मिळण्यासाठी प्रहार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव तालुक्यातील कोळगाव मंडळामध्ये जुन ते जुलैमध्ये २४ दिवसाचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे येथील पुर्ण महसुली मंडळात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

दि. १८ सप्टेबर २०२३ पासुन पाऊस चालु झाला त्या पावसामुळे सर्व प्रकारचे शेतातील पिक हे वाया गेलेले आहे. अतिपावसामुळे शेतातील पिकाची पुर्णपणे नासधुस झालेले असुन शेतकऱ्यांकडील आहे तो पैसा खर्च झालेला असुन, त्यामुळे सर्व शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेले आहे. परंतु आपण शासकीय स्तरावरुन आणेवारी ही भडगाव तालुक्याची ६४ % च्या वरती लावली असुन हे मोजमाप कसे केले. याचे आकलन आम्हाला झाले नसुन सदरची आणेवारी कशी लावली याचे आम्हास आपल्याकडुन माहिती मिळावी. व सरसकट ज्यांनी ई पिक पाहणी लावलेली असेल किंवा नसेल व ज्यांनी पिक विमा काढलेला असेल किंवा नसेल त्यांना सरसकट तुम्ही नुकसान भरपाई द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती माहितीस्तव मा. मुख्यमंत्रीसो., जिल्हाधिकारी सो. जळगाव, जिल्हा नियोजन समिती जळगाव, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोध पक्ष नेता, माजी महसुल मंत्री, तालुका कृषि अधिकारी भडगाव उपविभागीय अधिकारी सो. पाचोरा, व्यस्थापक सो. लिड बँक जळगाव (एच.डी.एफ.सी.) यांना पाठविण्यात आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.