विद्यापीठात १ ते ६ ऑक्टोबरदरम्यान गांधी सप्ताहाचे आयोजन

0

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने दि. २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या महात्मा गांधी टेकडीवर सकाळी ८ ते ९ या कालावधीत भजन प्रभात होणार आहे. याच दिवशी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय धुळे येथे निबंध स्पर्धा होईल. मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. सुगन बरंट यांचे सिनेट सभागृहात सकाळी ११ वाजता व्याख्यान होईल. दि. ४ ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दि. ५ ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात एक दिवसीय गांधी विचार शिबीर आणि दि. ६ ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथील एकलव्य प्रशिक्षण केंद्रात श्रमदान शिबीर होणार आहे अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे प्र. संचालक प्रा. म.सु. पगारे, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, गांधी अध्ययन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडीया यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.