Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बागेश्वर बाबांच्या अडचणीत वाढ ! तरुणी गायब, महिलेचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    बागेश्वर बाबांच्या अडचणीत वाढ ! तरुणी गायब, महिलेचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 16, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गेल्या काही महिन्यांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा वादात भोवऱ्यात अडकले आहेत. त्यातच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुणी गायब झाल्याचे वृत्त आहे.

    मयत महिला उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून एक महिन्यापासून ती पतीसोबत बागेश्वर धाममध्ये राहत होती. तिला किडनीचा आजार होता. उपचारासाठी ती बागेश्वर धाममध्ये आली होती. रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे ही महिला बागेश्वर धाममध्ये आली होती. बागेश्वर धाममध्ये आल्यानंतर तिला बरं वाटू लागलं होतं. मात्र अचानक तिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर पत्नीची श्रद्धा होती. त्यामुळेच तिला बागेश्वर धाममध्ये आणण्यात आलं होतं, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली आहे.

    ही घटना ताजी असतानाच बागेश्वर धामच्या प्रेत दरबारातून एक तरुणी गायब झाली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील देवकली जयराम येथील ही तरुणी आहे. नीरज मौर्या असं या मुलीचं नाव आहे. तिच्या वडिलांचं नाव ओमप्रकाश मोर्या असं आहे. गेल्या 12 फेब्रुवारी 2023पासून म्हणजे चार दिवसांपासून ही मुलगी गायब आहे. प्रेत दरबार बागेश्वर धाममधून आपली मुलगी गायब झाली आहे, असं या मुलीच्या वडिलाने सांगितलं. मुलीच्या बाबतीत कुणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ तिची माहिती द्या, असं आवाहन या मुलीच्या वडिलांनी लोकांना केलं आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bageshwar Baba Bageshwar Dham Bhopal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif