समाजकार्य महाविद्यालय व कबचौ.उमवि यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन.

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात Govt.of India Ministry of commerce and Industry आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्याने Intellectual  Property Awarness Mission अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते मयूर लोखंडे (Examiner of patents and Designs, patent Office, Mumbai) हे होते, तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथि प्रा. व्ही.व्ही.गिते( Incharge, IPR Cell) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघूळदे प्राचार्य शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, डॉ. राकेश चौधरी मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय डॉ.रविंद्र लढे हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.राजेंद्र वाघूळदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना IPR विषयी असलेले भ्रम, निराशा तसेच शैक्षणिक क्षेत्रात IPR ची अमलबजावणी व उपयुक्तता या विषयी चर्चा केली, प्रा. व्ही.व्ही. गिते यांनी Intellectual  Property Awarness Mission उद्देश्य स्पष्ट करताना विद्यापीठाची व सरकारची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून करण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मयूर लोखंडे यांनी Intellectual  Property म्हणजे काय.? Intellectual  Property चे प्रकार कोणते आहेत.?, Intellectual  Property ची उपयुक्तता काय आहे.? Intellectual  Property साठी अर्ज कसा करावा, तसेच जगभरात Intellectual  Property चे नामांकित उदाहरण कोणते आहेत.? या सर्व मुद्दया ची विविध उदाहरणे देऊन चर्चा करीत असताना Intellectual  Property सारखी संकल्पना अतिशय साध्या भाषेत व दैनदीन जीवनातील उदाहरणे देवून स्पष्ट केली. या नंतर उपस्थित संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांच्या शंकांचे निरसन वक्ते मयुर लोखंडे यांनी केले.

यादरम्यान महाविद्यालयातील सह प्राध्यापिका डॉ. सुनिता प्रमोद चौधरी यांची जळगाव जिल्हा महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रा डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्रा डॉ. राकेश चौधरी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भूषण राजपूत यांनी केले तर, आभार डॉ. रविंद्र लढे यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.