तरुणीचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

२५ वर्षीय तरुणीने एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत राहते. गेल्या २०२१ पासून ते आजपर्यत संशयित आरोपी समाधान पाटील (वय २७) याने तरुणीला तु माझ्याशी लग्न करण्याचा तगादा लावला. त्यास तरुणीने नकार दिल्याने त्याचे वाईट वाटून तरुणीच्या गावात येत तरुणीवर लक्ष ठेवत तरुणी घराबाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करून तिला शिवीगाळ व दमदाटी करून तिला धमकी दिली.

तसेच तरुणीला धमकी देत तरुणीचा ज्या ठिकाणी साखरपुडा झालेला आहे त्या तरुणाची माहिती काढून त्याच्या सोबत चाटिंग करीत साखरपुडा तोडण्याचा प्रयत्न केल्याने तरुणीची बदनामी झाली. याप्रकरणी तरुणीने मेहुणबारे पोलिसात संशयित आरोपी समाधान पाटील (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पीएसआय राजू सांगळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.