बबिता-टप्पूचा साखरपुडा ?, काय आहे सत्य..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बबिताजीच्या नावाने प्रसिद्धि असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचा साखरपुडा टप्पूची भूमिका करणाऱ्या राज सोबत झाल्याच्या बातम्या काही वेळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. दोघांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर येताच लोकांकडून दोघांचे अभिनंदन सुरु झाले होते. या बातमीवर अनेकांना विश्वास बसत नव्हता. अखेर ती बातमी खोटी असल्याचं पुढे आले आहे. मुनमुन दत्ताच्या टीमने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या बातमी मागील सत्य सांगितले.

मुनमुन दत्ता आणि राज यांच्या साखरपुड्याची बातमी येताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर दोघांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. आता या धक्कादायक बातमीवर मुमनून दत्ताच्या टीमने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. मुनमुन दत्ता आणि राज यांच्या वयात ९ वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता 36 वर्षांची आहे तर टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकट हा 27 वर्षांचा आहे. ही बातमी व्हायरल होताच चाहते कमेंट करु लागले होते.

विशेष म्हणजे मुनमुन आणि राज आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा भाग नाहीत. या दोघांनीही आधीच शो सोडला होता. दोघांनीही शो सोडल्यापासून त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.