‘सलमान ड्रग्ज घेतो..’, रामदेव बाबांचा बॉलिवूडवर निशाणा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचे लाखो फॅन फॉलेवर आहेत. रामदेव बाबा हे नेहमी चर्चेत असतात. आता रामदेव बाबा यांनी अभिनेता आमिर खानपासून (Aamir Khan) बॉलिवूडवरील (Bollywood) अनेक सेलिब्रिटींवर (celebrity) निशाणा साधला होता.

बाबा रामदेव शनिवारी आर्यवीर आणि वीरांगना परिषदेत सहभागी होण्यासाठी  मुरादाबादमध्ये (Moradabad) पोहोचले होते. यावेळी त्यांनी ड्रग्ज (drugs) विषयी बोलताना सगळ्यात आधी बॉलिवूडवर निशाणा साधला. बॉलिवूडचे मोठे कलाकार ड्रग्ज घेतात आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्री (Film industry) ड्रग्जच्या विळख्यात आली आहे. याशिवाय सलमान खान (Salman Khan) ड्रग्ज घेतो असा दावा बाबा रामदेव यांनी केला.

बाबा रामदेव म्हणाले की, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला आणि तो तुरुंगातही गेला. ‘सलमान ड्रग्जही घेतो. पण आमिर ड्रग्ज घेतो की नाही हे माहीत नाही. आज संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे. बाबा रामदेव पुढे म्हणाले की, ‘कलाकारांचा देव तर मालिक आहे.’

 

Leave A Reply

Your email address will not be published.