.. तर इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत असतो -योगगुरू बाबा रामदेव

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी देशासह विदेशातही आपला व्यवसाय करते. यामुळे बाबा रामदेव यांच्यावर अनेकदा योगगुरू नसून, बिझनेसमॅन असल्याचा आरोप लागत असतो. यावर आता स्वतः रामदेव स्वष्ट बोलले आहेत. साहित्य आजतकच्या मंचावर त्यांनी स्पष्टपने सांगितले की, त्यांनी देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता, तर आज ते उद्योगपती इलॉन मस्कपेक्षा श्रीमंत झाले असते.

यावेळी आपल्या जुन्या विधानाचा संदर्भ देत बाबा रामदेव म्हणाले की, ‘मी एकदा म्हटले होते की, टाटा बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, इलॉन मस्क, वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा स्वामी रामदेवची वेळ महत्वाची आहे. ते सर्व स्वतःसाठी जगतात, पण संन्यासी सर्वांसाठी जगतो. म्हणूनच माझा वेळ, शक्ती आणि ज्ञान सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि पूर्वजांकडून मला मिळालेले ज्ञान मी संशोधन करून सर्वांसमोर ठेवले.’

Leave A Reply

Your email address will not be published.