अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्या जळगांवात उद्घाटन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

कै. पदमश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजुरबाजार यांच्या पेंटींग चित्र प्रदर्शन दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी 2023 पावेतो वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौक जवळ, जळगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. आर्टिस्ट शिवम हुजुरबाजार यांचे जळगांव, पुणे, मुंबई येथे 9 चित्रप्रदर्शन झालेली असून नेहरू आर्ट गॅलरी वरळी, जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथेही पेंटींगचे प्रदर्शन झालेले आहे.

या अमुर्त पेंटींग प्रदर्शनाचे उदघाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार असून दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ह्या पेंटींग प्रदर्शनास सुरूवात होणार असून दि. 28 फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. तरी सर्वांनी ह्या चित्र प्रदर्शन पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.