लोकशाही न्यूज नेटवर्क
नागरिकांना सर्व सोयीसुविधांचा लाभ मिळावा मिळावा म्हणून सरकार अनेक योजना काढत असतं. आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाते. हे कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून, लाभार्थी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचार सुविधेचा लाभ घेऊ शकतो. हेच आयुष्मान कार्ड आता तुम्ही मोबाईलवरून 5 मिनिटामध्ये काढू शकतात.. चला तर मग जाणून घेऊया प्रक्रिया..
आवश्यक कागदपत्रे
-आधार कार्ड (आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असावा)
-शिधापत्रिका (सुरु असणे गरजेचे)
मोबाईलवरून आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
– प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या https://pmjay.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.
– अॅप डाउनलोड करून त्यावरूनही प्रक्रिया करू शकता.
– यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
– होम पेजवर तुम्हाला आयुष्मान कार्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
– ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर संमती फॉर्म उघडेल.
– तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायावर खूण करावी लागेल आणि Allow पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला Authentic च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– आता पुढील पानावर लाभार्थ्याशी संबंधित माहिती आणि फोटो तुमच्यासमोर उघडेल.
– यानंतर, तुम्हाला कॅप्चर फोटोच्या खाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून लाभार्थीचा फोटो कॅप्चर करावा लागेल आणि प्रोसिड पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला इतर माहिती टाकावी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– 80 टक्क्यांहून अधिक फोटो जुळल्यास आयुष्मान कार्ड तुमच्या समोर येईल.
– त्यानंतर तुम्ही ओके ऑप्शनवर क्लिक करून आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
हे कार्ड काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख सांगितली जात आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींनी लवकर हे कार्ड प्राप्त करून घ्यावे.