नेपाळमधून अयोध्येत आणल्या ६ कोटी वर्ष जुन्या दोन शालीग्राम शिळा (पहा व्हिडीओ )

0

प्रभू श्रीराम आणि सीता यांची मूर्ती साकारणार
अयोध्या / लोकशाही न्यूज नेटवर्क
नेपाळ येथील जनकपूरमधील काली नदीतून 373 किलोमीटर आणि 7 दिवसांच्या प्रवासानंतर दोन विशाल शालिग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या असून या शिलांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिळांच्या स्वागतासाठी शरयू नदीच्या पुलावर 2-3 हजार लोकांनी पुष्पवृष्टी करून आणि ढोल वाजवून उत्सव वातावरणात त्यांचे स्वागत केले. यावेळी जय श्रीरामचा जयघोष झाला. या 6 कोटी वर्ष जुन्या शालिग्राम शिळांपासून भगवान श्रीराम आणि देवी सीतेची मूर्ती बनवली जाणार असून जी श्री राम दरबारात स्थापित केली जाणार आहे.

 

रामसेवकपुरमपर्यंत शिळा पोहोचण्यासाठी मोठ्या गर्दीमुळे एक तास लागला. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, डॉ.अनिल मिश्र, महापौर ऋषिकेश उपाध्याय, यांच्या हस्ते रामसेवकपुरम येथे शिळा ठेवण्यात आल्या. सुरक्षेसाठी बाहेर पीएसी-पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद शिळा आणण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न करत होते. नेपाळमधील जनकपूर येथील काली नदीतून या शिळा काढण्यात आल्या आहेत. 26 जानेवारीलाशिळा अयोध्येला पाठवण्यात आल्या. यादरम्यान त्या बिहारमार्गे उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि गोरखपूरमार्गे बुधवारी रात्री अयोध्येत पोहोचल्या. एका शिळेचे वजन 26 टन, तर दुसऱ्या शिळेचे वजन 14 टन आहे. असे मानले जाते की या शिळा 6 कोटी वर्ष जुन्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.