पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, पतीवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरात संतापजनक घटना घडली आहे. पत्नीसोबत वर्षभरापासून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीविरुद्ध शनिपेठ पोलिसात (Shanipeth Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय विवाहिता शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह राहते. ३५ वर्षीय पती पिडीत पत्नीला दि २७ जानेवारी २०२२ पासून वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत होता. या कृत्याला पिडीतेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करत मारून टाकण्याची धमकी देत होता.

दरम्यान त्रास असह्य झाल्यानंतर पिडीत विवाहितेने १ फेब्रुवारी २०२३ रोजी शनिपेठ पोलिसात विकृत पती विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास मपोउपनिरी प्रिया दातीर ह्या करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.