Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्याची निर्घृण हत्या
    ताज्या बातम्या

    सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्याची निर्घृण हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 30, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

    औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात सैराटची (Sairat) पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे. तर हत्या करणारा आरोपी फरार झाला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केली आहे. औरंगाबाद पुणे महामार्गावरील (Aurangabad Pune Highway) दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री करून रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला.

    दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच, वाळूज पोलिसांनी (Waluj Police) घटनास्थळी धाव घेत आरोपी गेलेल्या दिशेने पोलीस पथके रवाना केली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिली. बापू खिल्लारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) पाठवण्यात आला आहे.

    Aurangabad Aurangabad Murder Case Aurangabad Pune Highway Ghati Hospital Murder Case Sairat Waluj Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif