ब्रेकिंग : CBSE 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांनो तयारी लागा कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CBSE 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, 12वीची परीक्षा देखील 15 फेब्रुवारी ते 05 एप्रिल 2023 या कालावधीत चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट http://cbse.nic.in आणि http://cbse.gov.in वर जाऊन डेटशीट तपासू शकतात. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वरून तारीख पत्रकाची PDF डाउनलोड करू शकतात.

CBSE बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा या वर्षी फक्त एकाच टर्ममध्ये घेतल्या जातील. CBSE बोर्डासाठी इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रोजेक्ट असेसमेंट 02 जानेवारी 2023 पासून सुरू होईल.

CBSE ची 10वी बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 21 मार्च 2023 रोजी संपेल. त्याचवेळी 12वीची परीक्षाही 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता 12वीच्या सर्व परीक्षा 05 एप्रिल 2023 रोजी संपणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.