डेहराडून, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज सकाळी भीषण कार अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. ऋषभच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभ पंत शुक्रवारी दिल्लीवरुन रुडकीला चालला होता. रुडकीला ऋषभच घर आहे. त्याची कार नारसन जवळ पोहोचताच डिवायडरच्या खांबाला धडकली. त्यानंतर कार पलटी झाली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC
— ANI (@ANI) December 30, 2022
ऋषभची कार डिवायडरला धडकली. या धडकेनंतर कारला आग लागली. या कारमधून पंत कसाबसा बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे.
दरम्यान ऋषभ पंतला सुरुवातीला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून पायाला फ्रॅक्चर आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतची विचारपूस केली. त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात रेफर केलय. पंतला या अपघातातून बर होण्यासाठी 3 ते 4 महिने लागू शकतात, अशी देखील माहिती मिळाली आहे.

