औरंगाबादातील किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जळणाऱ्या गुन्हेगारांना अटक

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

रामनवमीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद मधील जिन्सीतील किराडपुरा येथील राम मंदिरासमोर दोन गटात राडा झाला होता. या प्रकरणी आरोपींची ओळख पटवून पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. औरंगाबादातील (Aurangabad) किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जाळण्यात अग्रेसर असलेल्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सय्यद जुहूर सय्यद मोहीम (Syed Juhoor Syed Campaign), सय्यद इलियास सय्यद नाजेर (Syed Ilyas Syed Najer) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही जिन्सी भागातली राहणारे आहेत. विशेष म्हणजे दुचाकीवरुन येऊन वाहने जाळणाऱ्या या दोघांचा वीस दिवसांपासून शोध सुरू होता.

किराडपुरा दंगलीत पोलिसांची १४ वाहने जमावाने जाळली होती. ती वाहने सुरुवातीलाच पेटवणारी आणि एकापाठोपाठ एका वाहनांना आग लावण्यात अग्रेसर असलेले दोघे मोटार सायकलवरुन आले होते. किराडपुरा दंगल प्रकरणी ७९ दंगेखोरांना अटक केल्यानंतर वाहने पेटवलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यात दोन मित्र दुचाकीवरुन येताना आणि जाताना फुटेजमध्ये कैद झाले. तपासात ते जुहूर आणि इलियास असल्याचे निष्पन्न झाले. . न्यायालयाने त्यांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद मधील किराडपुणरयातल्या दंगलीत वाहने जाळण्यात अग्रेसर असलेले दोघे सीसीटीव्हीत कैद झाल्यावर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र आपल्याला पोलीस शोधत असल्याचा सुगावा लागताच दोघे रात्री उशिरा घरी येत असतांनाच शेवटी पोलीसांच्या ताब्यात सापडले.

Leave A Reply

Your email address will not be published.