युवतीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार ; एकाला अटक

0

कासोदा , लोकशाही न्यूज नेटवर्क
युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्ची घटना कासोदा परिसरातील एका गावात उघडकीस आली असून याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पिडीत तरुणीने कासोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २७ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२३ च्या दरम्यान, आरोपी विक्की उर्फ मनोहर पाटील याने पिडीतेस विश्वासात घेऊन माझे तुझ्यावर प्रेम असून तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. परंतू त्यानंतर पिडीतेने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विक्की याने पिडीतेस शिवीगाळ करुन तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी पिडीतेला जबरदस्तीने घरी नेत पुन्हा जबरदस्तीने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध केले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि निता कायटे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.