अंगलट करून काढलेले सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार

0

जळगाव;- पारोळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या जळगाव येथील विद्यार्थिनीचा अंगलट करून काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर रामानंदनगर परिसरातील रूमवर आणि अजिंठा चौफुली वरील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपीला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 

इमरान शब्बीर मन्यार हल्ली मुक्काम नगर जळगाव मूळ राहणार रा. साक्री, जि. धुळे आणि इकबाल शेख राहणार परभणी हल्ली मुक्काम आदर्श नगर अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेली असताना विद्यार्थिनीची  इम्रान मण्यार याच्याशी ओळख झाली. त्यानंतर महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढली. जून – जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने विद्यार्थिनीला तो राहत असलेल्या रामानंद नगर परिसरातील खोलीवर बोलविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इम्रानने विद्यार्थिनीसोबत अंगलट करीत सेल्फी काढले.

तीन दिवसांनी पुन्हा त्याने विद्यार्थिनीला फोन करून भेटण्यास बोलाविले व फोटो आई-वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी देत त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट – सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून धमकी देत अजिंठा चौफुली जवळील एका हॉटेलवर भेटण्यास बोलवून विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्रास असह्य झाल्याने तरुणीने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गभाले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.