अल्पवयीन मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती

0

पाचोरा ;– अल्पवयीन मुलीवर तीन वेळा अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलाीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला असून तिच्या घराच्या परिसरात राहणारा तुषार वसंत गायकवाड याने पिडीत मुलीवर तीन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिलीचा धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तुषार गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.