यावल येथे तरुणाची आत्महत्या

0

यावलः -शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या ओम नगरामध्ये शनीवारी रात्री एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

 

तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल शहरात भुसावळ रस्त्यावर विस्तारित भागात ओम नगर आहे. या ओम नगर मधील रहिवासी मनोज भागवत श्रीखंडे (वय ३५) या अविवाहित तरुणाने शनीवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला तेव्हा तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महेंद्र श्रीखंडे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे, हवालदार मोहन तायडे करीत आहे. या तरुणाने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.