श्रीराम कॉलनीत विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव: घरात कोणीही नसतांना वैशाली विजय सोनार (वय २८, रा. श्रीराम कॉलनी) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

शहरातील जूना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते चहा विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. विजय सोनार हे दुकानावर असतांना त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रासंपविली. विजय सोनार हे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी गेले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी पत्नीचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, रविंद्र बोदडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.