जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

लोकशाही न्युज नेटवर्क
अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने तरुणाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वताच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वताला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. भूषण नामदेव पाटील रा. कजगाव असे या आहे.

 

कजगाव या गावात शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले असून राजकीय दबावामुळे अतिक्रमणावर कारवाई केली जात नसल्याचा भूषण नामदेव पाटील या तरुणाचा आरोप आहे. अतिक्रमण काढून या ठिकाणी अद्ययावत बस स्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने भूषण पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातस्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी भूषण पाटील यांच्या हातातून पेट्रोलची कॅन तसेच भूषणला ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. भुषण यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी आवारात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.