‘चला आरोग्याचे वाण लुटू या’ स्नेहमिलन सोहळ्यात महिलांनी लुटले आरोग्याचे वाण

0

लोकशाही न्युज नेटवर्क

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्राती निमित्त “ चला आरोग्याचे वाण लुटू या ……!” या थीम अंतर्गत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी आनंदाने आरोग्याचे वाण लुटले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिल्पा बेंडाळे (संचालक आय. एम. आर. कॉलेज), प्राचार्य डॉ.गौरी राणे (बेंडाळे महिला महाविद्यालय), उपप्राचार्य करूणा सपकाळे (विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. कल्पना नंदनवार, जयश्री सोनार, मुख्याध्यापिक प्रणिता झांबरे (ए. टी. झांबरे विद्यालय), डॉ. देवानंद सोनार, प्रा. अनंत महाजन, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात ओंकार प्रार्थनेने करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. सोनल महाजन यांनी केले. सोहम योग अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी उपस्थित सर्व महिलांना संक्रांत निमित्त आयोजित या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी जळगाव भूषण पुरस्काराने सन्मानित प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एम. ए. योगिक सायन्स, बी. ए. योगिक सायन्स, योगशिक्षक पदविका या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीनी नृत्य, गायन आणि विविध मनोरंजनात्मक खेळ अशा भरगच्च कार्यक्रमांचे उत्कृष्ठ सादरीकरण केले.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना हळदी-कुंकू आणि आरोग्याचे वाण म्हणून आकर्षक एक्युप्रेशर रिंग, तसेच २३ ते ३० जानेवारी पर्यत ७ दिवस नि:शुल्क ऑनलाईन योग प्रशिक्षण तज्ञ योग प्रशिक्षकांद्वारा दिले जाणार असून जानेवारी महिन्यात निसर्गोपचाराच्या पॅकेज मधेही विशेष सवलत देण्यात आली. कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून प्रा. ज्योती वाघ आणि प्रा. सोनल महाजन यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता सोमाणी आणि सायली अजनाडकर यांनी केले. आभार प्रदर्शन शीतल पाटील यांनी केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गीतांजली भंगाळे, माधवी तायडे, वेविकानंद चौधरी, साहिल तडवी आणि विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनिंनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.