Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»जाणून घ्या शतावरीचे विविध फायदे
    लोकशाही विशेष

    जाणून घ्या शतावरीचे विविध फायदे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही विशेष लेख

     

    मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती.

    १) गुणधर्म

    १. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक

    २. डोळे, हृदय व शुक्रधातूला हितकर आणि गर्भपोषक

    ३. सप्तधातूंचे पोषण करणारे उत्तम रसायन ( इथे रसायन याचा अर्थ ‘केमिकल – लॅबोरेटरीत बनवता येते ते ‘ असा नाही, तर रसायन म्हणजे सप्तधातूचे पोषण करणारी द्रव्ये. त्यामुळे बुद्धिवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य मिळते.

    ४. बुद्धिवर्धक, बलवर्धक व रोगनाशक.

    ५. शरीरघटकांचा लवकर नाश होऊ देत नाही; परिणामी, वृद्धत्व लांबवते.

    २) उपयोग

    १. गर्भपोषक – स्त्री-पुरुषातील वीर्य वाढवते व गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यास मदत करते. भूक सुधारते. त्यामुळे गर्भारपणातील अशक्तपणा लवकर जातो. गर्भाचे योग्य पोषण करते. बाळंतपणानंतर अंगावरील दूध वाढविते व सूज कमी करते.

    २. मधुमेह – रक्तातील साखर व चरबी कमी करते. लघवीला साफ होते. यामुळे मधुमेह व कोलेस्टेरॉल वृद्धीवर उपयोगी.

    ३. स्नायूंच्या समस्या – स्नायूंची लवचिकता वाढते. स्नायूंच्या वेदना व सूज कमी करते आणि मांसाचे पोषण करते. आंत्रवण किंवा अल्सरमध्ये अंत:त्वचेला मऊपणा येतो. शतावरी तेल चोळून लावल्यास स्नायू कणखर बनतात; त्यांचा स्टॅमिना वाढतो.

    ३) वापरण्याची पद्धती
    शतावरी कल्प २ चमचे, एक कप दुधात टाकून, सकाळी व रात्री झोपताना घ्यावे किंवा शतावरी चूर्ण अर्धा ते एक चमचा + दूध १ कप उकळून, खडीसाखर – घालून प्यावे – (मधुमेहींनी साखर घालू नये.) रोज दोन वेळा

    संतोष ढगे, सांगली
    ८२०८४२६४९४

    Asparagus Lokshahi Special Article
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!

    July 19, 2026

    ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’

    July 17, 2026

    वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif