Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल होणार
    जळगाव

    मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल होणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

    पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

    महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. मोचा चक्रीवादळामुळे हवामानात बदल होणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

    के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागर आणि अंदमान समुद्रात 8 मे ला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 9 मे पर्यंत ते अजून तीव्र होण्याचा अंदाज देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. 8 ते 12 मे दरम्यान समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांना आणि पर्यटकांना समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

    दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्लीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

    Cyclone Mocha mocha
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif