दोन संशयितांचा असोदा गावात हवेत गोळीबार !

0

जळगाव, लोकशाही नेटवर्क
तालुक्यातील असोदा गावात मध्यरात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ आर्या हॉटेलजवळ घडला आहे. नेमकी हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात जळगाव तालुका पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळील हॉटेल आर्याजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवर दोन जण दारूच्या नशेत आले. हातात बंदूक घेऊन हवेत तीन फायरिंग करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस स्टेशन चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.