आ. राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरूण येथे आरोग्य शिबीर

0

जळगाव ;- क्षितिज युवा फाउंडेशन व भाजपा मेहरून मंडळ क्र 8 च्या वतीने आज दि 16/ रोजीजळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरून मधील साईबाबा मंदिर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी.महापौर सिमाताई भोळे, भाजपा गटनेते राजेंद्रभाऊ घुगे पाटील, नगरसेवक सदाशिवराव ढेकडे, नगरसेवक प्रशांत नाईक, भाजपा महानगर सरचिटनीस विठ्ठल पाटील, माजी.सैनिक किशोर ढाकने, रि.पा.ई.महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विलास भदाने, भाग्येश ढाकने, आसिफशाह बापू हे होते.

.या शिबीरात 300 ते 400 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यात नेत्रतपासणी, दंत तपासणी,जनरल तपासणी, मधुमेह तपासणी, अश्या वेगवेगळ्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमासाठी आर.एल.हॉस्पिटलचे डॉ.आदित्य जैन, नंदिनी चव्हाण,स्वप्निल पालवे, विशाल चौधरी नेत्रज्योती हॉस्पिटलचे फिरोज खान, शालू अडकमोल, दिपा सबनानी, चेतन जोशी, अपेक्स हॉस्पिटलचे डॉ.अब्द्दुल रज्जाक, यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, भाजपा मंडळ क्र 8 चे अध्यक्ष विनोद मराठे, किशोर वाघ, भाजपा आघाडी अध्यक्ष भूषण लाडवंजारी, निलेश घुगे पाटील, गौरव पाटील, हेमंत वंजारी, लोकेश वाघ, कुणाल सानप,पंकज तायडे, धिरज नाईक,ऋषिकेश वाघ,सागर सानप,सुमित सानप, अक्षय मेघे, शुभम ईश्वरे, गिरीश वाघ, आर्यन घुगे, तेजस वाघ, समर्थ राणे, महेश घुगे, यांच्या सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.